वाघनखे आणण्यासाठी मुनगंटीवार इंग्लंडला रवाना

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला रवाना झाले आहेत. इंग्लंडला रवाना होण्याआधी मुनगंटीवार यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. त्यांनी, ढोलताशाच्या गजरात मुनगंटीवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आशिष शेलारांचे ट्वीट मुनगंटीवार इंग्लंडला […]

वाघनखे आणण्यासाठी मुनगंटीवार इंग्लंडला रवाना

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला रवाना झाले आहेत. इंग्लंडला रवाना होण्याआधी मुनगंटीवार यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. त्यांनी, ढोलताशाच्या गजरात मुनगंटीवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

आशिष शेलारांचे ट्वीट

मुनगंटीवार इंग्लंडला रवाना झाल्यानंतर आशिष शेलार यांनी वाघनखांच्या मुद्यावरून उद्धव गटावर सडकून टीका केली. वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले?… छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघनखांचेही पुरावे मागू लागले?… असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number