चंद्रपूर, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून सरबत घेऊन रविंद्र टोंगे यांनी ओबीसींसाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
टोंगे २१ दिवसांपासून उपोषण करत होते. राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतर टोंगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
ओबीसी आरक्षणासाठी कटीबद्ध आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते उपाय लवकरच केले जातील. पंतप्रधान मोदींनी ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, असे राज्य शासनाने ओबीसींना सांगितले. यानंतर टोंगे यांनी राज्य शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत असल्याचे सांगत उपोषण मागे घेतले आहे.