मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचे दोन प्रकल्प बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. या आदेशाला मुंबईच्या उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत स्थगिती दिली आहे. याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवारांना बारामती अॅग्रोचे दोन प्रकल्प बंद करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे रोहित पवारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. बारामती अॅग्रोबाबत पुढील सुनावणी शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.
…म्हणून जमीन झाली नापीक
बारामती अॅग्रोमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे आसपासच्या शेतजमिनी नापीक होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई केल्याचे समजते.