अभिनेत्री अर्चना गौतमला मारहाण

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी आणि बिग बॉस या रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना गौतम ही तिच्या अनोख्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. कलर्सच्या या रिऍलिटी शोमुळे अर्चना बरीच चर्चेत आली. परंतू अलीकडेच तिच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. अभिनेत्री अर्चना गौतम हिला मारहाण झाली आहे. View this post […]

अभिनेत्री अर्चना गौतमला मारहाण

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी आणि बिग बॉस या रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना गौतम ही तिच्या अनोख्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. कलर्सच्या या रिऍलिटी शोमुळे अर्चना बरीच चर्चेत आली. परंतू अलीकडेच तिच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. अभिनेत्री अर्चना गौतम हिला मारहाण झाली आहे.

अभिनेत्री अर्चना गौतमी ही तिच्या वडिलांसोबत २९ सप्टेंबरला काँग्रेस कार्यालयात गेली होती. यावेळी तिला काँग्रेस कार्यालयातच प्रवेश नाकारण्यात आला. तर याउलट काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या काही महिलांनी तिला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली . त्यानंतर कार्यालयाबाहेरून हुसकावून लावले. याबाबत स्वत: अर्चनाने आरोप केला आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अर्चना प्रचंड संतापली आहे. यावर बोलताना ती म्हणाली “मी शांत बसणार नाही. मी पुढची लढाई लढणारच. माझ्यासोबत जे झालं. ते अत्यंत धक्कादायक आणि चुकीचं होतं”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number