दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी यंदाही रस्सीखेच

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाईनंतर शिवाजी पार्कवर पार पडला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला. यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क […]

दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी यंदाही रस्सीखेच

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता. गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाईनंतर शिवाजी पार्कवर पार पडला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला. यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडूनही पालिकेच्या दादर जी उत्तर विभाग कार्यालयात अर्ज दाखल झाले आहेत.

मागील वर्षी मेळाव्याला मैदान देण्यास पालिकेकडून टाळाटाळ झाल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने पालिकेची प्रशासकीय कार्यवाही चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेला ठाकरे गटाला परवानगी द्यावी लागली होती. यंदा शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर व ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख महेश सावंत यांनी अर्ज दिले असल्याची माहिती जी उत्तर कार्यालयाने देण्यात आली आहे. दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल असे जी उत्तर विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागाने कुणाचा अर्ज पहिला आला आहे याबाबत गुप्तता पाळली आहे. पालिका कार्यालयाला सुट्टी असून मंगळवारी तारखा सांगू अशी माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number