गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबई – पुणे, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

पुणे, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर देखील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर मध्यरात्री १२ ते २९ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्स्प्रेसवर […]

गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबई – पुणे, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

पुणे, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराप्रमाणे मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर देखील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर मध्यरात्री १२ ते २९ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्स्प्रेसवर बंदी घालण्यात आली आहे. गणपती विसर्जन आणि ईद एकच दिवशी आल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांची वाहतूक २८ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते २९ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अनंत चतुर्थी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेवरील एन एच ४८ म्हणजे जुना मुंबई – पुणे महामार्गावरून मुंबई शहर, नवी मुंबई तसेच ठाण्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दोन्ही सण एकच दिवशी आल्याने लाखोच्या संख्येने भाविक येथे रस्त्यावर उतरतात. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात या दिवशी महत्वाचे सर्व रस्ते बंद केले जातात. त्यामुळे बाहेरून येणारी अवजड वाहने या दिवशी बंद केल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होईल. पुण्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यावर १६ सप्टेंबर पासूनच बंदी करण्यात आली असून पोलिसांकडून चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number