आमदार अपात्रता, सुनावणीची पुढली तारीख जाहीर

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सोमवार २५ सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची सुनावणी झाली. सोमवारच्या सुनावणीसाठी ५४ आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. या सुनावणीनंतर पुढील सुनावणीसाठी शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ ही तारीख देण्यात आली. लवकरच सर्व आमदारांच्या वकिलांना सुनावणीचे वेळापत्रक दिले जाणार आहे. उद्धव गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

आमदार अपात्रता, सुनावणीची पुढली तारीख जाहीर

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सोमवार २५ सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेची सुनावणी झाली. सोमवारच्या सुनावणीसाठी ५४ आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. या सुनावणीनंतर पुढील सुनावणीसाठी शुक्रवार १३ ऑक्टोबर २०२३ ही तारीख देण्यात आली. लवकरच सर्व आमदारांच्या वकिलांना सुनावणीचे वेळापत्रक दिले जाणार आहे.

उद्धव गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात आमदारांच्या पात्रतेवरून मतभेद आहेत. या प्रकरणात घटनेतील तरतुदीच्या आधारे सुनावणी सुरू आहे.

जून २०२२ पासून आमदारांच्या पात्रतेवरून वाद सुरू आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे आमदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number