महिला क्रिकेट टीमची सोनेरी कामगिरी, भारताला दुसरे सुवर्ण

हँगझोऊ, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत अकरा पदके जिंकली आहेत. यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत हाँगकाँग आणि भारत हे दोन देश संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत. भारताच्या महिला क्रिकेट संघाने वीस षटकांच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. हरमनप्रीत कौरच्या […]

महिला क्रिकेट टीमची सोनेरी कामगिरी, भारताला दुसरे सुवर्ण

हँगझोऊ, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत अकरा पदके जिंकली आहेत. यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत हाँगकाँग आणि भारत हे दोन देश संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने वीस षटकांच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा एकोणीस धावांनी पराभव केला. याआधी भारताच्या पुरुष संघाने नेमबाजीत दहा मीटर एअर रायफल या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार या तीन खेळाडूंनी सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले.

१. भारताचा महिला क्रिकेट संघ – २० षटकांची क्रिकेट स्पर्धा – सुवर्ण पदक
२.रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार – पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ – सुवर्ण पदक
३. नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे – रोइंग – आठ पुरुष – रौप्य पदक
४. आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल – नेमबाजी – महिला दहा मीटर एअर रायफल संघ – रौप्य पदक
५. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग – रोइंग – पुरुषांचे लाईट दुहेरी स्कल्स – रौप्य पदक
६. बाबू लाल यादव आणि लेख राम – रोइंग – पुरुष जोडी – कांस्य पदक
७. रमिता जिंदाल – नेमबाजी – महिलांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
८. जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष – रोइंग – चार पुरुष – कांस्य पदक
९. परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग – चार पुरुष – कांस्य पदक
१०. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर – नेमबाजी – पुरुषांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
११. विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला – नेमबाजी – पुरुष पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ – कांस्य पदक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number