मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी ५४ आमदारांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आमदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील निर्णय घेणार आहेत.
उद्धव गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात आमदारांच्या पात्रतेवरून मतभेद आहेत. या प्रकरणात घटनेतील तरतुदीच्या आधारे सुनावणी सुरू आहे.
जून २०२२ पासून आमदारांच्या पात्रतेवरून वाद सुरू आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळे आमदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.