केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपतीचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानातील गणपतीचे दर्शन घेतले. तसेच लालबागच्या राजाचे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. याआधी शनिवारी दुपारी अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपतीचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानातील गणपतीचे दर्शन घेतले. तसेच लालबागच्या राजाचे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. याआधी शनिवारी दुपारी अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number