द्रास युद्धस्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट

द्रास, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या […]

द्रास युद्धस्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट

द्रास, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कारगिल युद्धात पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले. या युद्धात आपले अनेक जवान शहीद झाले. या जवानांच्या पराक्रमाची महती द्रास युद्ध स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असून हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट देऊन ‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी स्पर्धकांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय लष्करातर्फे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू असून त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

लष्करी जवानांशी संवाद

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्करी जवानांशी संवाद साधला आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी द्रास वॉर मेमोरियल येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पाय गमावलेल्या पिसाळ यांनी जिद्दीच्या जोरावर भारतभ्रमण सुरू केले आहे. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करत ते प्रवास करत आहेत. या कार्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कुमार यांचे कौतुक केले.

‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ पुस्तकाचे प्रकाशन

जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या ‘कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number