सोलापूर, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतात खाण्यापिण्याच्या पदार्थांचे प्रमाणीकरण करणाऱ्या सरकारी संस्था आहेत. एफएसएसएआय आणि एफडीए अशी या संस्थांची नावं आहेत. या संस्था काम करत असताना हलालच्या नावाने समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या धनाचा वापर दहशतवाद्यांना कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केला जात आहे. भारताच्या सुरक्षेचा विचार करून या प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे. यासाठीच हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी इस्लामी संस्थांना केंद्र सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
गणेशोत्सव हा आपला उत्सव आहे. या उत्सवासाठी आपल्या व्यापाऱ्यांकडून भारत सरकारच्या संस्थांनी प्रमाणीकरण केले आहे की नाही हे तपासून खरेदी करावी. गणेश उत्सवात हलाल प्रमाणपत्र असलेली उत्पादने खरेदी करणे टाळावे; असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केली आहे.