पुरातन जैन मंदिरात चोरी

इगतपुरी, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील पुरातन जैन श्वेतांबर आदेश्वर मंदिरात चोरी झाली आहे. मंदिर गाभाऱ्यातून भगवान शांतीनाथ, सिद्धचक्र भगवान आणि अष्टमंगल गट्टू ह्या मूर्तींची चोरी झाली आहे. या मूर्ती ५० वर्ष जुन्या आणि पंचधातूच्या असून त्यांचे वजन दोन ते अडीच किलो इतके होते. असे मंदिर विश्वस्थ यांचे म्हणणे आहे. हा […]

पुरातन जैन मंदिरात चोरी

इगतपुरी, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील पुरातन जैन श्वेतांबर आदेश्वर मंदिरात चोरी झाली आहे. मंदिर गाभाऱ्यातून भगवान शांतीनाथ, सिद्धचक्र भगवान आणि अष्टमंगल गट्टू ह्या मूर्तींची चोरी झाली आहे. या मूर्ती ५० वर्ष जुन्या आणि पंचधातूच्या असून त्यांचे वजन दोन ते अडीच किलो इतके होते. असे मंदिर विश्वस्थ यांचे म्हणणे आहे. हा सर्व चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, पोलके उपधीक्षक सुनील भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु झाला आहे. घोटी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, हवालदार शिवाजी शिंदे, केशव बसते, योगेश यंदे, श्वान पथक विभागाचे संतोष कडाळे, विठ्ठल बोरसे, अंगुली मुद्रा विभागाचे पोलीस निरीक्षक जोशी, पो. शि. गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, किशोर पाटील हे अधिक तपस करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number