अजित पवारांचे रोहित पवारांना रोखठोक उत्तर

पुणे, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार टि्वट करत म्हणाले होते की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे वक्तव्य राज्यातील एका बड्या नेत्याने केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटत आहे. त्यांनी हे सूत्र एका […]

अजित पवारांचे रोहित पवारांना रोखठोक उत्तर

पुणे, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार टि्वट करत म्हणाले होते की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे वक्तव्य राज्यातील एका बड्या नेत्याने केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटत आहे. त्यांनी हे सूत्र एका आमदारावर, खासदारावर लावले तर करोडो रुपयांची बचत होईल आणि त्यात अनेक शासकीय कर्मचारी काम करतील, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते.

अजित पवारांनी घेतला समाचार

अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे शहरात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहे. राज्यातील विविध विभागात दीड लाखांपेक्षा जास्त भरती सुरु आहे. परंतु आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि सोशल मीडियावर बातम्या पोहचवतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number