बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या

गोंदिया, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गोंदिया जिल्ह्यात सध्या बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या लाडक्या ‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र, महागाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसते आहे. शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून […]

बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या

गोंदिया, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: गोंदिया जिल्ह्यात सध्या बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या लाडक्या ‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र, महागाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसते आहे. शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काळ्या मातीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणाची उतरण करण्यासाठी पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरत आला आहे.

एक दिवसावर आलेल्या पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. बैलांच्या सजावटीसाठी घोगरमाळ, सुताचे कासरे, शिंदोरी, शिंगात घालण्यासाठी शेंब्या, पितळे तोडे, गोंडे, हिंगुळ आदींसह बैल रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांची दुकाने बाजारपेठेत थाटले आहेत. यंदा सर्व साहित्यांचे भाव वाढले आहेत. महागाई वाढली असली तरी, वर्षभर आपल्या शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आखडता हाथ न घेतल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number