औषधे उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेबाबत विभागप्रमुखांना निर्देश

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पालिका रुग्णालयामधील औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात किती औषधांची उपलब्धता आहे, कोणत्या औषधांचा तुटवडा भासतो, त्यामागील कारणे कोणती, ही उपलब्धता करण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करायला हवी याचा पालिका प्रशासनाने आढावा घेण्यास सांगितले आहे. काही रुग्णालयांना वारंवार निर्देश देऊनही संबधित विभागाकडून तसेच डॉक्टरांकडून ही माहिती देण्यात आलेली नाही. औषधे […]

औषधे उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेबाबत विभागप्रमुखांना निर्देश

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पालिका रुग्णालयामधील औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात किती औषधांची उपलब्धता आहे, कोणत्या औषधांचा तुटवडा भासतो, त्यामागील कारणे कोणती, ही उपलब्धता करण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करायला हवी याचा पालिका प्रशासनाने आढावा घेण्यास सांगितले आहे. काही रुग्णालयांना वारंवार निर्देश देऊनही संबधित विभागाकडून तसेच डॉक्टरांकडून ही माहिती देण्यात आलेली नाही. औषधे उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य न केल्यास त्या रुग्णालयातील विभागाच्या विभागप्रमुखांना दोषी धरण्यात येईल, असे स्पष्ट लेखी निर्देश पालिकेने दिले आहेत.

मुंबई महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये, १६ उपनगरी रुग्णालये, ५० दवाखाने असून, येथील रुग्णांना लागणाऱ्या औषधांची खरेदी ही मध्यवर्ती खरेदी कक्षाकडून करण्यात येते. मात्र, औषध तुटवडा निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर प्रतिदिन ४० हजारांपर्यंत औषधे खरेदी करता येतात. याचाच फायदा घेत मध्यवर्ती खरेदी कक्षाकडून मागील तीन वर्षांमध्ये १७७९ शेड्यूल्ड औषधांपैकी फक्त ६१२ औषधांसाठीच्या निविदा अंतिम करत उर्वरित औषधांचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातो.

कृत्रिम तुटवडा निर्माण केलेल्या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर खुल्या बाजारातून करण्यात येते. ही औषधे तीन ते चारपट अधिक दराने खरेदी केली जातात. मागील तीन वर्षांत अशा प्रकारे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मागील तीन वर्षांत अंदाजे ६० कोटी रुपये, उपनगरी रुग्णालयांसाठी २५ कोटी आणि दवाखान्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवरील औषध विक्रेत्यांकडून चढ्या दराने करण्यात आली आहे, असा आरोप ‘ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन’ने केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number