कोल्हापूर, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ताई गटाचे खासदार शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात निर्धार सभा झाली. या सभेला काही दिवस उलटत नाहीत तोच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांची सभा होत आहे. ही सभा रविवारी आहे. उत्तरदायित्व सभा असे नाव या सभेला देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांची पण रविवारी सभा आहे. वचनपूर्ती सभा असे या सभेचे नाव आहे. ही सभा जळगाव येथे दुपारी एक वाजता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांची सभा तपोवन मैदानावर संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असेल असे अजित पवार यांच्या समर्थकांनी सांगितले.