रविवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना

कोलंबो, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : श्रीलंकेत कोलंबो येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. हा अंतिम चार या फेरीतील तिसरा सामना आहे. रविवारच्या भारत – पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर होणार आहे. । India vs Pakistan Asia Cup […]

रविवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना

कोलंबो, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : श्रीलंकेत कोलंबो येथे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. हा अंतिम चार या फेरीतील तिसरा सामना आहे. रविवारच्या भारत – पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर होणार आहे. । India vs Pakistan Asia Cup 2023 Super Fours 3rd Match

अंतिम चार या फेरीचे आणखी तीन सामने होणार आहेत. यानंतर अंतिम सामना होणार आहे. सध्या अंतिम चार या फेरीत पाकिस्तान दोन गुणांसह पहिल्या स्थानी आणि श्रीलंका दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. धावगतीच्या आधारे गुणतक्त्यात पाकिस्तानने आघाडी घेतली आहे. रविवारच्या सामन्यात भारताचा विजय झाला तर अंतिम चार या फेरीत दोन गुण मिळवणाऱ्या संघांची संख्या तीन होईल आणि पुढील तीन सामन्यांचे महत्त्व वाढेल. भारताचा पराभव झाला तर पाकिस्तान चार गुणांसह अंतिम चार या फेरीतले स्वतःचे स्थान आणखी भक्कम करेल. सामना बरोबरीत सुटला अथवा पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत पाकिस्तान तीन गुणांसह अंतिम चार या फेरीतले पहिले स्थान कायम राखेल तर भारत एका गुणासह तिसऱ्या स्थानावर राहील.

भारत विरुद्ध पाकिस्तान, अंतिम चार फेरीतील तिसरा सामना
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका
थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी ३ पासून सुरू

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्ण, टिळक वर्मा
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इमाम-उल-हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, सौद शकील, मोहम्मद नवाज, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम ज्युनियर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number