पुणे, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: कोजनरेशन असोसिएअशन ऑफ इंडिया यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या देशपातळीवरील नॅशनल कोजनरेशन पारितोषिके २०२३ चे वितरण पुढील शनिवारी दिनांक १६ सप्टेंबरला वाकड येथील हॉटेल टीप टॉप येथे होणार आहे. कोजन इंडियाचे संस्थापक स्वतः शरद पवार आहेत. याच संस्थेच्या कार्यक्रमाला आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर अजित पवार व शरद पवार पुण्यातील टिळक पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र आले होते परंतु त्या ठिकाणी जास्त राजकीय भाष्य झालेलं नाही परंतु आता या ठिकाणी हे नेते काही राजकीय बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.