‘आमच्या आरक्षणाला धक्का नकोच’

जालना, ०४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला आहे. आरक्षणावरून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मार्ग कसा निघाणार यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समावेश होतोय का हे पाहावं लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी […]

‘आमच्या आरक्षणाला धक्का नकोच’

जालना, ०४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला आहे. आरक्षणावरून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मार्ग कसा निघाणार यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समावेश होतोय का हे पाहावं लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

दादा गटाचे छगन भुबजळ म्हणाले की,
ओबीसींचे आरक्षण फक्त १७ टक्के उरलेला आहे. १७ टक्क्यांत ४०० जाती आहेत. यामुळे सगळ्यांची अडचण होईल. ५० टक्क्यांचा कॅप ओलांडून दहा टक्के ओपनला वाढवलेले आहे. भारत सरकारने आणखी दहा टक्के वाढवून त्यात मराठा समाजासह पटेल, कापू ,जाट यांना आरक्षण द्या म्हणजे सगळ्यांचा प्रश्न मिटेल. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. १७ टक्क्यात ५४% ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही. यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षाने देखील आपलं मत मांडलं पाहिजे.

ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितलं पाहिजे. सगळ्यांनी जाऊन दिल्लीत बसलं पाहिजे. हे सगळं सहज करता येणं शक्य आहे. नाहीतर, पुन्हा लढाया सुरुच राहणार, मोर्चे निघणार, आंदोलन होणार आणि परत तोंडाला पाण पुसली जाणार, असं भुजबळ यांनी म्हटलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number