इंडिया आघाडीचं घोषवाक्य निश्चित

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारत एकत्र आलेल्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं आज एक पाऊल पुढं टाकलं. मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. तसंच, आघाडीचं घोषवाक्यही ठरवण्यात आलं.देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीची बैठक कालपासून मुंबईतील ग्रँड […]

इंडिया आघाडीचं घोषवाक्य निश्चित

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारत एकत्र आलेल्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं आज एक पाऊल पुढं टाकलं. मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. तसंच, आघाडीचं घोषवाक्यही ठरवण्यात आलं.देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीची बैठक कालपासून मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू आहे. आज या आघाडीची औपचारिक बैठक झाली. त्यात राष्ट्रीय पातळीवरील समिती ठरवण्यात आली.

या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, एमके स्टॅलिन, मेहबुबा मुफ्ती, जावेद खान, लल्लन सिंह, डी. राजा आणि तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.आघाडीच्या आजच्या बैठकीत एक घोषवाक्यही निश्चित करण्यात आलं. या घोषवाक्यात भारत या शब्दाचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे. जुडेगा भारत, जितेगा इंडिया… असं हे घोषवाक्य आहे.

इंडिया आघाडीच्या निमंत्रकाचं नाव निश्चित होईल अशी चर्चा होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होती. मात्र, त्यावरून काही वाद होऊ नयेत म्हणून निमंत्रक पदाचा निर्णय टाळण्यात आल्याचं समजतं.इंडिया आघाडीचा लोगो अद्याप ठरलेला नाही. त्यासाठी काही सूचना आणि प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ते आल्यानंतर त्यातून लोगो ठरवण्यात येणार आहे. त्याशिवाय जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत घाई करू नये असं काँग्रेसला वाटतं. पुढच्या काही महिन्यांत देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यांचे निकाल आल्यानंतर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं काँग्रेसला वाटतं. तसं झाल्यास काँग्रेसला आपली बाजू मजबूत करता येईल असा पक्षातील सूत्रांचा होरा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number