राजनाथ सिंह आज शिर्डी दौऱ्यावर

शिर्डी, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डी विमानतळावर सकाळी ११.३० वाजता त्यांचे आगमन होणार तसेच पुढे साईंचं दर्शन घेणार आहेत. त्‍यानंतर मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या लोणी येथील निवासस्‍थानी जाऊन भेट देणार आहेत. याप्रसंगी त्‍यांच्‍या समवेत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत. […]

राजनाथ सिंह आज शिर्डी दौऱ्यावर

शिर्डी, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डी विमानतळावर सकाळी ११.३० वाजता त्यांचे आगमन होणार तसेच पुढे साईंचं दर्शन घेणार आहेत. त्‍यानंतर मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या लोणी येथील निवासस्‍थानी जाऊन भेट देणार आहेत. याप्रसंगी त्‍यांच्‍या समवेत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत.

दुपारी दोन वाजता प्रवरानगर येथील गाडगीळ सभागृहासमोर उभारलेल्या भव्य शामियानात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील काला गौरव आणि साहित्य पुरस्कार वितरणाच्या मुख्‍य कार्यक्रमासाठी या सर्व मान्‍यवरांचे आगमन होणार असून, या सर्वांचे स्‍वागत करण्‍यासाठी लोणी आणि प्रवरानगर परिसर सजविण्‍यात आला आहे. दरवर्षीच पद्मश्रींचा जयंती दिन हा साहित्‍याची मांदीआळी म्‍हणून ओळखला जातो.

मागील ३२ वर्षांपासून साहित्‍य आणि कला गौरव पुरस्‍कार देवून, राज्‍यातील आणि जिल्‍ह्यातील साहित्यिकांना सन्‍मानित करण्‍याची परंपरा प्रवरा परिवाराने जपली आहे. साहित्‍य क्षेत्रामध्‍ये या पुरस्‍काराला आता मोठी प्रतिष्‍ठा मिळत आहे. मागील वर्षी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत या पुरस्‍काराने साहित्यिक आणि कलाकारांना सन्‍मानित करण्‍यात आले होते. यंदाच्‍या वर्षी संरक्षण मंत्री या सन्‍मान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number