बीड,२८ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची रविवारी बीड येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी पुण्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. यावेळी भुजबळांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील शनिवार चौकात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करत मोठ्या घोषणा बाजी करण्यात आल्या, असेच त्यांच्या फोटोला जोडे मारुन त्यांनी केलेल्या टीकेचा निषेध करण्यात आला.रविवारी बीड येथे पार पडलेल्या सभेत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले होती की, “साहेब म्हणतात.. माझी चुक झाली, माफी मागतो”. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल “, अशी टिका भुजबळ यांनी पवारांवर केली होती. त्याचे पडसाद आज पूण्यात उमटताना दिसले.
छगन भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केलं. तुरुंगातून आल्यानंतर देखील पवारांनी त्यांना मंत्रीपद दिलं. शरद पवारांकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवाताचा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन होणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिला आहे.