बेस्टच्या ताफ्यात आता आणखी एसी डबलडेकर

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईची जीवनवाहिनी असे रेल्वे आणि बेस्टच्या बस सेवेला म्हणतात. याच कारणामुळे बेस्टच्या निर्णयाचा लाखो नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होतो. मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या बेस्ट बस सेवेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बेस्टमुळे मुंबईकरांना लवकरच वाजवी दरात गारेगार प्रवासाची अनुभूती मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात आणखी डबलडेकर बस समाविष्ट करण्याचा […]

बेस्टच्या ताफ्यात आता आणखी एसी डबलडेकर

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईची जीवनवाहिनी असे रेल्वे आणि बेस्टच्या बस सेवेला म्हणतात. याच कारणामुळे बेस्टच्या निर्णयाचा लाखो नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होतो. मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या बेस्ट बस सेवेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

बेस्टमुळे मुंबईकरांना लवकरच वाजवी दरात गारेगार प्रवासाची अनुभूती मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात आणखी डबलडेकर बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या एसी डबलडेकर गाड्यांची संख्या २० पेक्षा जास्त होणार आहे. नव्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाले असून, लवकरच या गाड्या मुंबईतील विविध मार्गांवर धावणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यात सध्या १२ डबलडेकर बस असून, या गाड्या दक्षिण मुंबईत चालवल्या जातात. जुन्या साध्या डबलडेकर गाड्या येत्या काही दिवसात कालबाह्य होणार असल्याने इतर बेस्टच्या गाड्यांवर ताण वाढला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number