पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात हॉटेल रेवळला येथे मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार बाहेर पडू न शकल्याने आगीत होरपळले. यातील दोघे कामगार जागीच ठार झाले. एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक पोहोचल्यावर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात मध्यराञी एक वाजण्याच्या आसपास मार्केटयार्ड, गेट नंबर येथील एका हॉटेलला आग लागली. या घटनेत आतमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु आहे. आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
सदर ठिकाणी दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमधे आग लागली होती. शटर आतमधून कुलूपाने बंद असून ३ कामगार पोटमाळ्यावर अडकल्याचे समजले असता जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत आतमधे पोटमाळ्यावर प्रवेश केला. आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत तिथे अडकलेल्या शशिकांत गवळी, मुन्ना,संदिप (वय अंदाज २५ ते ३५) या ३ कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. पुढे कार्यवाही करत आग विझवली. आगीचे कारण समजू शकले नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.