‘अकोला दंगलीची चौकशी सीबीआयनं करावी’

अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे. तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टि्वटद्वारे अकोल्यात उसळलेल्या […]

‘अकोला दंगलीची चौकशी सीबीआयनं करावी’

अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे. तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टि्वटद्वारे अकोल्यात उसळलेल्या दंगलीवर भाष्य केलं आहे. मिटकरी म्हणाले,
घटनास्थळी अकोला पोलीस एका तासानंतर पोहोचली. पोलिसांनाच ही दंगल घडवुन आणायची होती का? कर्नाटक निकालानंतर संभाजीनगरप्रमाणे भाजपाने अकोल्यात घडवली आहे का याची नि:पक्ष चौकशी गृह विभागाने करावी व आमच्या जिल्ह्यात शांतता कायम ठेवावी. अकोल्यात रविवारी १३ मे मध्यरात्री दोन वाजता गटात तुफान दगडफेक होऊन अनेक जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर ताबडतोब एका पक्षाचे प्रतिनिधी तिथे पोहोचले .कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. सत्ताधाऱ्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केल्याची चर्चा आहे. यावेळी या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मिटकरीनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number