मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले.त्यामुळे शिंदेचा हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तसेच सातारा दौरा रद्द करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे हे सातारा येथे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जात होते. मुंबईतील राजभवन येथून एकनाथ शिंदे सातारा येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र बिघाड झाल्याचे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
इमर्जन्सी लँडिंगवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे हेलिकॅप्टरमध्ये उपस्थित होते. हेलिकॅाप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे बंद पडला आणि त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा नियोजित सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे.