मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :सध्या सर्वत्र साऊथ सिनेसृष्टीचा बोलबाला आहे. साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रीची चर्चा बॉलिवूड अभिनेत्रींच्या लोकप्रियतेपेक्षा कमी नाही. दक्षिण भारतीय अभिनेत्रीही हिंदी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये अनुष्का ही उत्तम अभिनेत्रीं मध्ये जास्त ओळखली जाते. ती नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस येते. बाहुबली आणि बाहुबली २ या दोन चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर अनुष्काचे पुढचे चित्रपट यशस्वी ठरले नाही. त्यानंतर बराच वेळ अनुष्का कोणत्या चित्रपटात दिसली नाही त्यामुळे अनुष्का गायब कुठे झाली ? ती नवीन चित्रपट करेल का ? अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होत्या.
तर आता तिच्या चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण, अनुष्का लवकरच ‘मिस शेट्टी मिस्टर पोली’ या चित्रपटात पुन्हा दिसून येणार आहे. अनुष्काने तिच्या चित्रपटातील लूक इंस्टाग्राम या समाज माध्यमानवर सामायिक केला.हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. अनुष्काचे बाहुबली नंतर अनेक चित्रपट यशस्वी ठरले नाही मात्र हा चित्रपट आणि चित्रपटातील भूमिका कशी असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.या चित्रपटाची निर्मिती महेश बाबू पी तसंच युव्ही क्रिएशन बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली. हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
बाहुबली २’ मधली तिने साकारलेली ‘देवसेना’ ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती. एका रात्रीत अनुष्का ग्लोबल स्टार झाली होती. या दरम्यान प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती. मात्र, स्वतः प्रभासने तो आणि अनुष्का दोघं फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं.