आंदोलक आणि पोलीस आमने – सामने

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये वातावरण तापलेले बघायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित आज मोर्चा काढला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थ मात्र चांगलेच आक्रमक झाले असून जिथे […]

आंदोलक आणि पोलीस आमने – सामने

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये वातावरण तापलेले बघायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित आज मोर्चा काढला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थ मात्र चांगलेच आक्रमक झाले असून जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. यावेळी अनेक नागरिकांनी पोलिसांना बाजूला करत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वातावरण मात्र चांगलेच तापले.

मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तात असतांनाही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना जुगारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडून आंदोलन कर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. खरेतर अनेक आंदोलकांना पोलिस अडवू न शकल्याने त्यांनी जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी साखळी पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये नागरिकांना अडविण्यात पोलीस अपयशी ठरले होते.

दरम्यान, बऱ्याच वेळ ही संपूर्ण परिस्थिती तणावाची झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले. मात्र, नागरिकांचा विरोध अधिक वाढत असतांना सर्वेक्षण सुरू असल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळल्याची बघायला मिळाली. त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number