‘कृष्णा नदी बचाव’साठी आंदोलन

कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध सांगली शहरात मानवी साखळी आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीच्या आयर्विन पुलापासून ते महापालिकेच्या दारापर्यत ही मानवी साखळी आंदोलन होत आहे. या आंदोलनात सामान्य नागरीक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटक या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले आहेत. नदीमध्ये अनेक कारखान्याचे रासायनिक आणि मळीमिश्रित पाणी सोडले जाते. तसेच शेरी नाल्याचे […]

‘कृष्णा नदी बचाव’साठी आंदोलन

कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध सांगली शहरात मानवी साखळी आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीच्या आयर्विन पुलापासून ते महापालिकेच्या दारापर्यत ही मानवी साखळी आंदोलन होत आहे. या आंदोलनात सामान्य नागरीक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटक या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले आहेत. नदीमध्ये अनेक कारखान्याचे रासायनिक आणि मळीमिश्रित पाणी सोडले जाते. तसेच शेरी नाल्याचे पाणी नदीमध्ये सोडले जाते. नुकतेच लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला. दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता.

त्यानंतर आता कृष्णा नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकरांचा एकसंघतेचा हुंकार पहायला मिळत आहे.कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध सांगली शहरातील नागरिक जागृती मंचच्या वतीने मानवी साखळी करत आंदोलन केलं. आयर्विन पुलापासून ते महापालिकेच्या दारापर्यत या मानवी साखळी ने आंदोलन करण्यात आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सर्वच घटक आज एकवटले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number