मेघालय, नागालँडमध्ये शपथविधी

नेफ्यू रिओ यांनी मंगळवारी पाचव्यांदा नालालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या शपथविधीसह नागालँडमध्ये पुन्हा एकदा नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी- भाजप आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे. नागालँडच्या १६ जिल्ह्यांतील ६० पैकी ५९ विधानसभा मतदार संघांत २७ फेब्रुवारी रोजी ५.९०% मतदान झाले होते. ही टक्केवारी गतवेळच्या तुलनेत […]

मेघालय, नागालँडमध्ये शपथविधी

नेफ्यू रिओ यांनी मंगळवारी पाचव्यांदा नालालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या शपथविधीसह नागालँडमध्ये पुन्हा एकदा नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी- भाजप आघाडी सरकार अस्तित्वात आले आहे.

नागालँडच्या १६ जिल्ह्यांतील ६० पैकी ५९ विधानसभा मतदार संघांत २७ फेब्रुवारी रोजी ५.९०% मतदान झाले होते. ही टक्केवारी गतवेळच्या तुलनेत १०% जास्त आहे. २०१८ मध्ये येथे ७५% मतदान झाले होते. गत १० फेब्रुवारी रोजी येथील अकुलुतो विधानसभा क्षेत्रताील काँग्रेस उमेदवार खेकाशे सुमी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. यामुळे भाजप उमेवदार कजेतो किनिमी यांचा बिनविरोध विजय झाला होता.

कॉनरॅड संगमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. दुसरीकडे, नागालँडमध्ये नेफियू रिओ दुपारी १.४५ वा. ५व्या कार्यकाळाची शपथ घेतील. यावेळीही मोदी व शहा उपस्थित राहतील.

मेघालयमध्ये एनपीपी, यूडीपी, भाजप आणि एचएसपीडीपी यांचे युती सरकार स्थापन झाले आहे. कॉनराड संगमा यांनी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी ३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष संगमा यांनी नव्या युती सरकारचे नाव ‘मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स २.०’ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात एनपीपीला जागा, यूडीपीला २ जागा आणि भाजप आणि एचएसपीडीपीला प्रत्येकी एक जागा दिली जाईल.

मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला विधानसभेच्या ५९ जागांसाठी मतदान झाले होते. २ मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये NPP २६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर, यूडीपीला ११ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि टीएमसीला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. तर भाजपने दोन जागा जिंकल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number