राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ई डी, या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली असुन सक्षम राजकीय पर्याय म्हणून राज्यातील जनता आम पार्टी कडे बघत आहे. पण त्याच ‘आप’मध्ये फूट पडत असल्याची पाहायला मिळत आहे. हरिभाऊ राठोड यांनी ‘आप’ला रामराम केल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल हे मुंबई दौऱयावर होते त्यांनी मुंबईमध्ये येऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट देखील घेतली आणि त्यात आता आम आदमी पार्टीचे नेते तसेच माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आम आदमी पार्टी रामराम ठोकला आहे .
जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित पक्ष मात्र एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात मराठा, ओबीसी,मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षना सारखा विषय मार्गी लावण्यात सरकार असफल ठरले आहे. अश्यातच ‘आप’चे दिल्ली व पंजाब मॉडेल जनतेचा चर्चेचा विषय बनला आहे. पण त्यात आता कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीनंतर ‘आप’मध्ये कलह झालेला पाहायला मिळत आहे.