‘नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न’

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव तसेच ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचं पत्र खुद्द संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिलं […]

‘नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न’

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव तसेच ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचं पत्र खुद्द संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना दिलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.

“सत्तांतरानंतर सुरक्षेच्या बाबतीत जी समिती आहे. यात गृहमंत्री, पोलीस दलाचे अधिकारी, विशेष दलाचे अधिकारी आहेत. ही समिती दर तीन महिन्यांनी सुरक्षा द्यायची की नाही, याचा रिव्ह्यू घेते. सुरक्षा कमी करण्याचा निर्णय त्या समितीने घेतला. आता परत तो डामडौल हवा असेल तर असं एखादं पत्र द्यायचं, त्यात मा.मुख्यमंत्री यांच्या मुलाचं नाव घ्यायचं. खा. श्रीकांत शिंदे यांचं नाव घ्यायचं. स्वतःची सुरक्षा अनावश्यक वाढवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number