आंबेडकरांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. निर्णयाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर राजकारणातून संमिश्र भूमिका उमटत आहेत. […]

आंबेडकरांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. निर्णयाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली.

एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर राजकारणातून संमिश्र भूमिका उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल.”

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी कोर्टात अपील केलं पाहिजे. निवडणूक आयोग चिन्ह किंवा पक्षाच्या झगड्यात निर्णय देणं अधिकारात येतं का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number