गोंदिया शहरातील सुर्याटोला येथील देवानंद मेश्राम वय ५२ वर्ष व त्याची मुलगी आरती किशोर शेंडे वय ३५ वर्ष, नाती जय किशोर शेंडे वय ४ वर्ष हे रात्री झोपले असताना जावाई किशोर शेंडे वय ४१ वर्ष रा. भिवापूर तिरोडा यांनी गोंदिया येथे सासऱ्याच्या घरी रात्रीच्या सुमारास आला व
देवानंद मेश्राम,मुलगी आरती किशोर शेंडे, नाती जय किशोर शेंडे यांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना रात्री १२ ते १ च्या सुमारास घडली असून देवानंद मेश्राम याचा जळून मृत्यू झाला तर आरती व जय हे ९० टक्के जळाले असुन त्यांना नागपुर येथे उपचारा साठी पाठविण्यात आले आहे. तर जवाई फरार असून पोलिस शोध घेत आहे.