‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणवत नाही’

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला आवडत नाही, पण म्हणावं लागतं, असं विधान करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील आंगणेवाडी येथे भाजपची आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी नारायण राणे म्हणाले,”या जिल्ह्यात मला 33 वर्षे […]

‘फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणवत नाही’

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला आवडत नाही, पण म्हणावं लागतं, असं विधान करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील आंगणेवाडी येथे भाजपची आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी नारायण राणे म्हणाले,”या जिल्ह्यात मला 33 वर्षे पूर्ण झाली. या जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझं कार्यक्षेत्र मुंबई. 90 साली आलो आणि तेव्हापासून मी या जिल्ह्यात काम करतोय. शिवसेनेतून सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये आहे. आता हे शेवटचं, यानंतर कोणताही पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो, शंभर टक्के असतो, असं राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले “देवेंद्र फडणवीस हे भाजपामधील प्रमुख नेते आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना विकासाची अनेक कामे केली आहेत. आता त्यांना मला उपमुख्यमंत्री शब्द बोलायला आवडत नाही तरीपण बोलावं लागतं,”असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number