देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे मोदी सरकार नेमक्या कोणकोणत्या घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य लागले होते. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महाग होणार आहेत.
महाग होणाऱ्या वस्तू…
सोने- चांदीच्या किमतीत वाढ होणार आहे, सिगारेट महागणार आहेत. सोन्या- चांदीची भांडी, एक्स-रे मशीन, प्लॅटिनम, विदेशी किचन चिमणी, एक्स-रे मशीन महाग होणार आहेत.
स्वस्त होणाऱ्या वस्तू…
तर दुसरीकडे इलेक्ट्रिक कार, मोबाईल फोन, एलएडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट, सायकल, लिथिअम आयन बॅटरी, परदेशातून आयात होणारी खेळणी, कॅमेरा, कॅमेरा लेन्स, कपडे बायोगॅसशी संबंधित वस्तू या वस्तू स्वस्त होणार आहेत.