पवारांचा नातू क्रिकेटच्या मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तसेच आयसीसी आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा ते राहिले […]

पवारांचा नातू क्रिकेटच्या मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तसेच आयसीसी आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा ते राहिले होते.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आवडत्या खेळासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, ”खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे. पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं. ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसलं तरी आदरणीय पवार साहेबांच्या रूपातील सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहूनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार ! अस ट्विट रोहित पवारांनी केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number