बिहारमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘अग्निपथ’ला विरोध

केंद्र सरकारने तीन सुरक्षा सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. ही नवीन योजना चार वर्षांसाठी असणार आहे, मात्र सैन्यात भरतीसाठी सरकारची ही योजना विद्यार्थ्यांना आवडलेली नाही. बिहारसह देशभरातील अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये कालपासून नाराजी पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये केंद्राच्या अग्निपथ योजनेला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. संतप्त तरुणांनी रस्ता आणि रेल रोको आंदोलन केले. […]

बिहारमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘अग्निपथ’ला विरोध

केंद्र सरकारने तीन सुरक्षा सेवांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे. ही नवीन योजना चार वर्षांसाठी असणार आहे, मात्र सैन्यात भरतीसाठी सरकारची ही योजना विद्यार्थ्यांना आवडलेली नाही. बिहारसह देशभरातील अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये कालपासून नाराजी पाहायला मिळत आहे.

बिहारमध्ये केंद्राच्या अग्निपथ योजनेला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. संतप्त तरुणांनी रस्ता आणि रेल रोको आंदोलन केले. तसेच अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला तर रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आली.

अग्निपथ योजनेला काँग्रेसचा आक्षेप

अग्निपथ योजनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. नवी लष्करी भरती हा लष्कराच्या अभिमानाशी खेळ अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. ‘भारताला सध्या दोन आघाड्यांवर आव्हान असताना अग्निपथ योजना सशस्त्र  दलांची कार्यक्षणता कमी करू शकते. त्यामुळे या सरकारने लष्कराचा अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी ट्विट करत राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवर आक्षेप नोंदवला आहे.

कशी आहे अग्निपथ योजना?

  • भारतीय लष्कराच्या तीनही दलात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार
  • चार वर्षांनंतर ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार
  • २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार
  • अग्निवीरांना चांगले वेतन देण्यात येणार
  • सैन्यातून बाहेर पडताना चांगली रक्कम दिली जाईल
  • सेवेदरम्यान बलिदान दिले तर कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत मिळणार
  • अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number