भाजपने आज विधान परिषदेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव डावलून नवीन चेहरे यांना उमेदवारी देण्यात आली असून आज जळगावात समस्त वंजारी समाज यांच्या तर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात जळगावातील आकाशवाणी चौकात निदर्शने करत निषेध करण्यात आला आहे.
यावेळी विधान परिषदेसाठी भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, अशी चर्चा होती. पंकडा मुंडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोने करेल आणि मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी ही लोकांची इच्छा आहे असेल म्हणत त्यांनी सुचक विधान केलं होतं. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पाच जणांच्या यादीतून पंकजा मुंडे यांचं नाव कट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सुर होता. आणि त्यामुळेच जळगावातील आकाशवाणी चौकात निदर्शने करत निषेध करण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे मुंडे समर्थकांनी टोकाची भुमिका घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी केंद्रातील सरकार आणि भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.