मनसे नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांनीही अटकपूर्व अटकपूर्व जामीन अर्जासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार आहेत. काय आहे प्रकरण? मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ […]

मनसे नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांनीही अटकपूर्व अटकपूर्व जामीन अर्जासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याची कबुलीही पोलिसांना दिली. मात्र, काही वेळानंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु, गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. तसेच त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. तसेच संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही गेले. मात्र, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार झाले आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने १७ मे रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number