ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

गेले अनेक दिवस ठाणे महापालिका आणि प्रशासक चर्चेत आहेत ते म्हणजे पाणी प्रश्नावरून, अनेक वेळा महापालिका निवडनुकीवेळी ठाण्याचे स्वतंत्र धरण बांधण्याचे आश्वासन राजकीय नेत्यांकडून देण्यात येत होते मात्र आता चाळी प्रमाणे उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक देखील पाण्यापासून वंचित झालेले पाहायला मिळत आहेत. या सर्व सुशिक्षित उच्चभृ इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टँकरचा आधार […]

ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

गेले अनेक दिवस ठाणे महापालिका आणि प्रशासक चर्चेत आहेत ते म्हणजे पाणी प्रश्नावरून, अनेक वेळा महापालिका निवडनुकीवेळी ठाण्याचे स्वतंत्र धरण बांधण्याचे आश्वासन राजकीय नेत्यांकडून देण्यात येत होते मात्र आता चाळी प्रमाणे उच्चभ्रू सोसायटीतील नागरिक देखील पाण्यापासून वंचित झालेले पाहायला मिळत आहेत. या सर्व सुशिक्षित उच्चभृ इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक वेळा महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून देखील नागरिकांच्या झोळीत निराशाच आहे.

टँकरच्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना या पाण्यामुळे त्रास झाला तर महापालिका प्रशासन जबाबदार असेल असे देखील इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नागरिकांचा जीव घेत आहे की काय अशी परिस्थिती ठाण्यात निर्माण झाली आहे. हंडा मोर्चा आणि नागरिकांच्या पाण्यासाठीच्या आक्रोषाने महापालिका प्रशासन जाग होतंय का आणि नागरिकांची समस्या सुटतात का हे देखील पाहण तितकंच महत्वाचं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number