तुम्ही 74 वर्षांचे आहात ’56 इंच ‘तुम्हाला रोखू शकत नाही, चिदंबरम यांच्या मुलाचे वडिलांना पत्र

INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तिहार कारागृहात बंद आहेत. यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांना भावनिक पत्र लिहत शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात कार्ती यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा पाठवल्या आहेत, तर आज आपण 74 वर्षांचे आहात परंतु कोणताही ’56 इंच ‘तुम्हाला रोखू शकत नाही. असा […]

तुम्ही 74 वर्षांचे आहात ’56 इंच ‘तुम्हाला रोखू शकत नाही, चिदंबरम यांच्या मुलाचे वडिलांना पत्र

INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तिहार कारागृहात बंद आहेत. यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांना भावनिक पत्र लिहत शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात कार्ती यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा पाठवल्या आहेत, तर आज आपण 74 वर्षांचे आहात परंतु कोणताही ’56 इंच ‘तुम्हाला रोखू शकत नाही. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लगावला आहे

1 सप्टेंबरला दिल्लीच्या विशेष कोर्टाने  INX मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टात प्रलंबित असून त्यावर23  सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

कार्तीच्या पत्रात नेमकं काय?

चांद्रयान-२ मोहिमेचे लाईव्ह स्ट्रिमिंग बघायला तुम्हाला आवडले असते. “सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये मध्ये तुमची विशेष आवड आहे.  तो अभिमानाने हे पहाण्याची संधी आम्हाला  मिळाली. इस्रोच्या लॅंडरशी संपर्क तुटला आणि खूप नौटंकी  झाली.

देशात जीडीपी घसरला आहे याला मोदी सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा न्यूटन-आईन्स्टाइन  सुरु असलेला किस्साही त्यांनी पत्रात शेअर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन याही त्यांच्या आर्थिक मंदीवरून ट्रोल झाल्या होत्या. ते ही त्यांनी पत्रात लिहले आहे.

मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या १०० दिवसांचा सोहळा साजरा करीत असताना तुम्ही सरकारच्या विरोधात बोलत होतात त्यामुळे तुम्हाला तुमचा आवाज दाबण्यात आला आहे. त्ताधारी पक्षाविरोधात बोलण्याला मोठे साहस लागते असं ही ते म्हणाले आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number