डॉ.पद्मसिंह पाटील आणि पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भाजप प्रवेशाची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामाराम केला आहे. उस्मानाबाद शहरात मेळावा घेऊन त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. गेल्या 20 वर्षांत जिल्ह्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी सोडल्यावरही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याबद्दल आदर असल्याची भावना त्यांनी […]

डॉ.पद्मसिंह पाटील आणि पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भाजप प्रवेशाची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामाराम केला आहे. उस्मानाबाद शहरात मेळावा घेऊन त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली.

गेल्या 20 वर्षांत जिल्ह्याचा विकास रखडला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी सोडल्यावरही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याबद्दल आदर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दोघांच्या भाजपप्रवेशामुळे गेल्या महिनाभरापासुन सुरू असलेल्या त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय. राष्ट्रवादीसाठी हा मोठाच धक्का आहे. पण भाजपची ताकद मात्र या पक्षप्रवेशामुळे वाढणार आहे, हे निश्चित.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number