‘या’ गोष्टींच अमिष दाखवत ‘त्याने’ घातला 43 महिलांना कोट्यवधींचा गंडा

खाजगी जीवनात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतःला वशीकरण स्पेशालीस्ट समजून घेणाऱ्या वशीकरण बाबाने देशविदेशातील 43 महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गंडा घातलेल्या महिलांमध्ये न्युझीलंड, कँनडातील महिलांही समावेश असून वेबसाईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून व्हाईस चेंजर अपच्या माध्यमातून महिलांना गंडा घातला जात होता. नेमकं प्रकरण काय? पंडित रुधर शर्मा असे […]

‘या’ गोष्टींच अमिष दाखवत ‘त्याने’ घातला 43 महिलांना कोट्यवधींचा गंडा

खाजगी जीवनात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतःला वशीकरण स्पेशालीस्ट समजून घेणाऱ्या वशीकरण बाबाने देशविदेशातील 43 महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गंडा घातलेल्या महिलांमध्ये न्युझीलंड, कँनडातील महिलांही समावेश असून वेबसाईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून व्हाईस चेंजर अपच्या माध्यमातून महिलांना गंडा घातला जात होता.

नेमकं प्रकरण काय?

पंडित रुधर शर्मा असे या वशीकरण बाबाचे नाव आहे. फिर्यादी महिलेच्या खाजगी जीवनात अडचणी आल्यामुळे महिला वशीकरणाचा शोध गुगलवर घेत होती. याच वेळी या महिलेला नाशिकमधील व्ही. एन. नाईक कॉलनी, पंडित नगर येथे राहणाऱ्या शर्मा याचा पत्ता मिळाला. पत्त्याचा शोध घेतला असता तिथे असा कुणीही व्यक्ती राहत नसल्याचे समजले.

या महिलेने सदर व्यक्तीस दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी शर्मा यास या महिलेने खाजगी जीवनातील अडचणी सांगितल्यानंतर वेगवेगळे कारण देऊन या इसमाने या महिलेकडून लाखो रुपये उकळले दरम्यान पैसे देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाली असं या महिलेला समजलं.

त्यानंतर या महिलेने नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली या प्रकरणाची चौकशी करत असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आता एका एजंटला ताब्यात घेऊन मुख्य सूत्रधार असलेल्या बाबाचा तपास घेत आहेत. खाजगी जीवनात आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतःला वशीकरण स्पेशालीस्ट समजून घेणाऱ्या वशीकरण बाबाने देशविदेशातील 43 महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number