‘या’ ध्येयवेड्याने स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च शिखर कळसुबाईवर फडकवला तिरंगा

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कँपवर तिरंगा फडकविण्याचा पराक्रम केलेल्या बीड जिल्ह्यातील शिवाजी भागवत महागोविंद या ध्येय वेड्या तरुणाने सायकलवर साडेतीनशे किलोमीटर प्रवास करत आज स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई येथे तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला आहे. कळसुबाई येथे तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील रहिवासी असलेला शिवाजी गिर्यारोहक […]

‘या’ ध्येयवेड्याने स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च शिखर कळसुबाईवर फडकवला तिरंगा

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कँपवर तिरंगा फडकविण्याचा पराक्रम केलेल्या बीड जिल्ह्यातील शिवाजी भागवत महागोविंद या ध्येय वेड्या तरुणाने सायकलवर साडेतीनशे किलोमीटर प्रवास करत आज स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई येथे तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला आहे.

कळसुबाई येथे तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील रहिवासी असलेला शिवाजी गिर्यारोहक आहे. त्याने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बेस कँपवर 8 मे रोजी तिरंगा फडकविला होता.

त्यानंतर त्याने स्वातंत्र दिनाला कळसुबाई शिखरावर तिरंगा फडकवायचा असा निर्धार करून 12 ऑगस्टपासून सलग तीन दिवस साडेतीनशे किलोमीटर सायकलने प्रवास करून शिखर गाठले आणि आज गुरुवारी स्वातंत्र्य दिनी पहाटे साडेपाचला शिखर चढण्यास सुरुवात केली.

वाटेत पाऊस व जोरदार वारा लागला परंतु तरीही तो डगमगला नाही व अवघ्या दिड तासात शिखर सर केले व तेथील मंदिरावर तिरंगा व भगवा झेंडा सकाळी फडकविला. यावेळी शिवाजीचा उर अभिमानाने भरून आला होता.

शिखरावर परत आल्यावर पायथ्याशी असलेल्या जहागीरवाडी या ठिकाणी शिवाजीचे स्वागत रुपाली बाळू घोडे या मुलीने रक्षाबंधन निमित्त राखी बांधून केले. दरम्यान शिवाजीच्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number