कॅनडात खलिस्तान समर्थक सुखदूल सिंग ठार

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कॅनडात खलिस्तान समर्थक सुखदूल सिंग उर्फ सुखा दुनेके ठार झाला. सुखा मूळचा भारतातील पंजाबमधील मोगाचा आहे. सुखा दविंदर बंबीच्या टोळीचा सदस्य होता. तो २०१७ मध्ये अटक टाळण्यासाठी बनावट पासपोर्ट वापरून पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. कॅनडातील विनिपेगमध्ये अज्ञातांनी सुखावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सुखा ठार झाला. सुखा हा […]

कॅनडात खलिस्तान समर्थक सुखदूल सिंग ठार

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कॅनडात खलिस्तान समर्थक सुखदूल सिंग उर्फ सुखा दुनेके ठार झाला. सुखा मूळचा भारतातील पंजाबमधील मोगाचा आहे. सुखा दविंदर बंबीच्या टोळीचा सदस्य होता. तो २०१७ मध्ये अटक टाळण्यासाठी बनावट पासपोर्ट वापरून पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. कॅनडातील विनिपेगमध्ये अज्ञातांनी सुखावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सुखा ठार झाला.

सुखा हा खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेचा सदस्य अर्श डल्ला याचा जवळचा सहकारी होता. जून २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर ठार झाला. यानंतर खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांना नव्याने सक्रीय करण्यासाठी अर्श आणि सुखा दोघे प्रयत्न करत होते. हे प्रयत्न सुरू असतानाच सुखाला ठार करण्यात आले. यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

भारताचा कॅनडाला दणका

कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया भारताने स्थगित केली आहे. पुढील आदेशापर्यंत ही प्रक्रिया स्थगित राहणार असल्याचे भारताने जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केला होता. हरदीपसिंग निज्जरवर गोळ्या झाडण्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण एकही पुरावा सादर केला नव्हता. यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले. या वातावरणात भारताने व्हिसा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाब पोलीस सक्रीय

पंजाबमध्ये पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या टोळीतील गुंडांना अटक करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. ठिकठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number