India’s First Private Railway Station : भारतातील ‘या’ शहरात पहिले खासगी रेल्वे स्टेशन; लाउंज, फुडकोर्टसारख्या अनेक सुविधा

भारतात सात हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत, जे सरकारच्या मालकीचे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात असंही एक रेल्वे स्टेशन आहे, जे सरकारच्या मालकीचे नसून खासगी रेल्वे स्टेशन आहे. चला तर पाहुयात

India''s First Private Railway Station : भारतातील ''या'' शहरात पहिले खासगी रेल्वे स्टेशन; लाउंज, फुडकोर्टसारख्या अनेक सुविधा

1 / 7

भारतात सात हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत, जे सरकारच्या मालकीचे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात असंही एक रेल्वे स्टेशन आहे, जे सरकारच्या मालकीचे नसून खासगी रेल्वे स्टेशन आहे. चला तर पाहुयात

2 / 7

मध्य प्रदेशातील भोपालमध्ये ''राणी कमलापती रेल्वे स्टेशन'' आहे. पूर्वी या रेल्वे स्टेशनचे नाव ''हबीबगंज'' असे होते. नोव्हेंबर 2021 मध्ये, या स्टेशनचे नामांतर ''हबीबगंज'' पासून ''राणी कमलापती रेल्वे स्टेशन'' असे करण्यात आले

3 / 7

''राणी कमलापती रेल्वे स्टेशन'' भारतीय रेल्वेच्या मालकीचे असले तरी, बन्सल ग्रुपने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत या स्टेशनची पुनर्बांधणी आणि संचालन केले आहे. हे भारतातील पहिले खासगीरित्या व्यवस्थापित आणि पुनर्विकसित केलेले रेल्वे स्टेशन आहे

4 / 7

भोपालमधील ''राणी कमलापती रेल्वे स्टेशन'' अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये लाउंज, हाय स्पीड एलिवेटर, फूड कोर्ट, पार्किंग, 24/7 वीज पुरवठा, वातानुकूलित लॉबी, हॉटेलसारख्या अनेक सुविधा आहेत

5 / 7

या रेल्वे स्टेशनमध्ये ऑटोमॅटिक टिकीट व्हेंडिंग मशीन उपलब्ध आहेत. सोबतच, ''राणी कमलापती रेल्वे स्टेशन'' परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आले आहे

6 / 7

हे स्टेशन भारतातील अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे आणि त्याची विमानतळासारखी आधुनिक रचना, स्वच्छ प्लॅटफॉर्म्स आणि इतर सुविधांमुळे ते प्रवाशांना आकर्षित करत आहे

7 / 7
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number