Deepotsav Varanasi 2025 : लक्ष दिव्यांनी उजळली काशीनगरी, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य
कार्तिक पौर्णिमेचा उत्साह काल उत्तर-पूर्व भारतात बघायला मिळाला.
लाखो दिव्यांनी काशीनगरी अक्षरशः उजळून निघाली
कार्तिक पौर्णिमेनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभेच्छाही दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील काशी घाटचे अप्रतिम दृश्ये एक्सवर (पूर्व ट्विटर) शेअर केली
शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये लक्ष दिव्यांनी आकाश प्रकाशमय झाले होते
दरम्यान शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये गंगा घाट उजळून निघाला आहे
''जणू ''न भूतो न भविष्यति'' अशी जाणीव काशीनगरी करून देत आहे'', अशी पोस्ट योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर (पूर्व ट्विटर) शेअर केली
''देव दिवाळी'' दिपोत्सवादरम्याने सुमारे 25 लाख दिवे लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे