खजूरामध्ये पाणी, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला समावेश असतो.यामुळे शरीराला विविध पोषकतत्त्वे मिळतात.
1 / 5
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर अन्न आतड्यांतून सहज पुढे नेण्यास मदत करते. ज्यामुळे कब्ज सारख्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. याचा अर्थ पचन प्रक्रियेसाठी खजूर खाणे फायद्याचे ठरते.
2 / 5
खजूरमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आढळतात. जे शरीरातील सूज कमी करण्यास उपयुक्त ठरते. खजूर सेवन केल्यामुळे मेंदूशी संबंधित अल्झायमरचा धोका कमी होण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती सुधारण्यासही हे फळ फायद्याचे ठरते.
3 / 5
खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. हे फळ गोड असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही. यातील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाणात नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
4 / 5
खजूरमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोहार्मोन्स हे घटक आढळतात. जे त्वचेच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरतात. अकाली वृद्धत्वासारख्या समस्या दूर करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.